आजचा लोकसत्ता वाचला का? पी साईनाथ यांच्या हिंदूस्थान टाईम्समधील लेखाचा अनुवाद? निवडणूक काळात पहिल्या रांगेतल्या अनेक वृत्तपत्रांची पानच्या पान राजकिय पुढा-यांना विकली गेली होती आणि ती ही गुपचुप वाचकांना विश्वासात न घेता. सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता ही वृत्तपत्र आपण गेली अनेक दशके वाचत आलो आहोत … माधव गडकरी, गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर यासारख्या अनेक साक्षेपी संपादकांनी आपल्या वैचारिक विश्वाची मशागत केलेली आहे. तीच वृत्तपत्रे जर असले अनैतिक प्रकार करायला लागली असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? छगन भुजबळांची प्रतिमाधुलाई वाचताना हे लक्षात आलंच होत … पण ज्यांच्याविषयी आपण प्रथमच वाचतो त्यांच काय आणि जे तरुण आत्ताच त्यांची मतं बनवू लागले आहेत त्यांच काय? प्रसिध्दि माध्यमांचा एक अतिशय निषेधार्ह काळा चेहरा या निमित्ताने पुढे आला आहे. ज्या वृत्तपत्रांनी हा निषेधार्ह प्रकार केला त्यांची नावे जाहिर झाली पाहिजेत आणि त्यांच्यावर खटले भरले गेले पाहिजेत.
खळबळजनक आणि निषेधार्ह … वृत्तपत्रांची ढासळलेली नैतिकता
नोव्हेंबर 1, 2009 by mandarrp
हाच ब्लॉगपोस्ट जरा विस्तारित स्वरूपात लिहाल का?